STAR ONE NEWS MARATHI-  संपादक - सचिन रेवगडे +919623968773 MH-01-0181832/Page Visiter 20 Lakh 14 k
बीड-Beedमहाराष्ट्र

Santosh Deshmukh murder : आदल्या दिवशी आरोपी आणि PSI राजेश पाटलांची हॉटेलमध्ये भेट, दुसऱ्या दिवशी संतोष देशमुखांचा मर्डर; पोलिसांना सगळंच माहिती होतं का?PSI राजेश पाटील यात शामिल?

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणाचा गुंता वाढला, आरोपीला भेटला संतोष देशमुखांचा भाऊ?आणखी एक CCTV फुटेज समोर

Updated on: Dec 17, 2024 | 09:45 PM

  बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात पीएसआय राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख एकत्र चर्चा करताना दिसत आहेत. पहिल्या फुटेज आणि या नवीन फुटेजमध्ये फक्त ४ मिनिटांचे अंतर आहे. यामुळे हत्या प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे.


भेटीचा चा व्हिडीओ व्हायरल……..

 


 

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मस्साजोग मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि पोलीस अधिकारी राजेश पाटील यांच्यात झालेल्या भेटीचं सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे. पोलीस अधिकारी राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुले याची केज मधील एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस अधिकारी राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुले यांच्या भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आठ दिवस होत आलेत. या प्रकरणात पोलिसांनी कोणतीही भूमिका घेतली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला होता. त्याच अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे चार दिवसापूर्वीच निलंबन करण्यात आले आहे. पीएसआय राजेश पाटील आणि या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हे केज शहरातील बसंत बिहार उडप्पी हॉटेलमध्ये भेटले होते. त्याचाच सीसीटिव्ही व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

  बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दुसरा सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ ‘स्टार वन न्यूज मराठी’च्या हाती लागला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीएसआय राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि मयत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हे एकत्र एकाच टेबलवर समोरासमोर बसले असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे पहिल्या व्हिडिओत आणि दुसऱ्या व्हिडिओत केवळ 4 मिनिटांचा अंतर आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आणखी वाढल्याची चर्चा आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पण नेमकं काय घडलं आहे? पीएसआय राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि धनंजय देशमुख नेमके का भेटले? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. 


रोहित पवारांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट



   दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज मस्साजोग गावात जावून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. त्यांनी घटनेवर प्रतिक्रिया दिली. “अतिशय भीतीदायक आणि अमानवीय घटना संतोष देशमुख यांच्यासोबत 9 तारखेला घडली. या घटनेत मोठ्या लोकांचा हात आहे. हे सामान्य लोकांना देखील पटलेले आहे. वाल्मिक कराड यांच्या विरोधात पवनचक्की प्रकल्पावर खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यात मास्टरमाईंड हा वाल्मिक कराड आहे. वाल्मिक कराड याला लवकरात लवकर अटक केली पाहिजे”, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Page Visiter 20 Lakh 14 k