
Writer by ⭐ स्टार वन न्युज मराठी ™
1 एप्रिल 2025
🔴स्टार वृत्तसेवा अकोले ⭐ अहिल्यानगर
अकोले 🔴✍️ मागील काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे अकोले तालुक्यात वाळू चोरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वेळीच या वाळू चोरांच्या मुसक्या न आवळल्यास गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते. कारण “भितूय का कुणाला…!’ प्रशासन आमच्या खिशात कोण वाकड करत मी बघतो. करा वाळू उपसा आणि करा खाली माझ्या घरी अशी मुजोर भाषा वाळू चोर तस्कर संदीप वाकचौरे वापरू लागले आहेत. महसूल विभाग व पोलिसांनी संयुक्त प्रयत्न करून या वाळू चोरांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.
आज दिनांक 1 एप्रिल रोजी अकोले पोलिस स्टेशन चे पी आय मोहन बोरसे यांना सकाळी गुप्त माहितीद्वारे हिवरगाव आंबरे येथील शिवारात मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असल्याबाबत माहिती मिळाली.
त्यानुसार पी आय बोरसे यांनी लगेच पीएसआय. खांडबहाले आणि काही पोलिस हवालदार यांचे संयुक्त पथक नेमून त्यांना सगळी माहिती अवगत करून स्पॉट वर जाऊन कार्यवाही करण्यासाठी सूचना दिल्या.
त्यानुसार. पीएसआय खांडबहाले पोलिस हवालदार गोडगे. भोसले. पो. गोरे अन्य पोलिस हे सध्या गणवेशात हिवरगाव शिवारात आले.
शिवारात आले असता. त्यांना हिवरगाव कडे जात असणारा अडगळीच्या रस्त्यावरून एक निळ्या रंगाचा सोनालिका ट्रॅक्टर वाळू रेती भरून नेत असताना निदर्शनास पडला. ट्रॅक्टर थांबवला असता.
हा ट्रॅक्टर संदीप रमेश वाकचौरे याचा असल्याचे समजले.
आणि हा ट्रॅक्टर रेती खाली होण्यासाठी संदीप वाकचौरे याचा घरी जात असल्याचे समजले. त्यानुसार ट्रॅक्टर ताब्यात घेऊन वाळू खाणी वर जाऊन JcB ताब्यात घेतला.

गेल्या 3 वर्षापासून होते वाळू तस्करि कोणाचे लागेबांधे???
✨ जिथे खाली होणार होता तिथे गेल्या 2 वर्षा पासून खुप मोठ्या प्रमाणात वाळू वाहून नेली जाते. परतू महसूल खाते यावर कोणतीही कार्यवाही करू शकले नाही.
कारण हिवरगाव मधील तलाठी आणि सर्कल आमच्या इशाऱ्यावर नाचते अधिकारी आमच्या खिशात असतात तसेच तहसीलदार आमचे काही करू शकत नाही. कारण आमची वर पर्यंत पोहच आहे…
त्यामुळेच आम्ही 80 90 ब्रास वाळू घरी नेऊन डेपो करून ठेवला. आमचे कोणी ही वाकडे करू शकत नाही असे लोकांना शेखर रमेश वाकचौरे आणि संदीप रमेश वाकचौरे. लोकांना सांगत होते..✨✨
रात्रीस खेळ चाले!!!!!!! 🚜
आणि हे खरे ही असेल कारण गेल्या दोन ते तीन वर्षापासून संदीप रमेश वाकचौरे हा अवैध वाळू उपसा करत आहे त्याने 200 250 ब्रास वाळू त्याचा घरी नेऊन खाली करून.
त्याचा परिसरा मध्ये सपाट करून दिली.
तसेच. गणोरे हिवरगाव रोड वर लागून असलेले soil chargar गोडाऊन पुढे ही मागील काही महिन्यापूर्वी अशीच वाळू वाहून खाली करण्यात आली नंतर परिसरा मध्ये JCB लाऊन सपाट करण्यात आली..
आणि आता गेल्या 2 महिन्यापासून 5 6 ट्रॅक्टर च्या साहाय्याने रात्री आणि दिवसा वाळू वाहून नेऊन तस्कर संदीप रमेश वाकचौरे च्या घरा समोर मोठा डेपो करून ठेवण्याचे काम चालू होते..आणि त्या डेपो वर रात्री भर पाण्या चा पाईप लाऊन माती धुण्याचे काम सुरू होते.
आणि ते पाणी सगळ्या ओढा मध्ये वाहून जात होते..
यामुळे स्थानिकाना याचा मनस्ताप सहन करावा लागला. सगळे पाणी ओढ्यात वाहून येत होते.
आणि स्थानिक जर याची कंप्लेंट करण्यासाठी गेले तर याची दखल प्रशासन घेत नव्हते. आणि वरुण हेच वाळू चोर यांना धमकावत आणि सांगत तुम्हाला कुठे जायचे जा. कारण येतील तलाठी मंडल तहसीलदार आमच्या इशाऱ्यावर नाचतात. आमच्यावर कार्यवाही होऊ शकत नाही..
⭐असाच अनुभव JCB मालक गौतम घोसाळे ला आला कारण प्राथमिक माहिती नुसार JCB मालक वाळू काढून देण्यासाठी येत नव्हता कारण तो म्हणाला अवैद्य वाळू उपसा आहे मी येणार नाही. परतू संदीप रमेश वाकचौरे म्हणाला तुम्ही टेन्शन घेऊ नका कोणी कार्यवाही करण्यासाठी आले तर मी मॅनेज करील माझे तलाठी आप्पासोबत बसणे उठणे आहे. यामुळे JCB मालक JCB घेऊन आला परतू अकोले पोलिस पथकाने त्याचा ही JCB वाळू खाणी वर वाळू उपसा करत असताना जप्त करून अकोले पोलिस स्टेशन मध्ये आणला.
आता संदीप रमेश वाकचौरे बोलतो तलाठी सर्कल माझ्या खिशात आहे सगळे माझ्या इशाऱ्यावर नाचतात.आता का नाचतात. याचा ही अनुभव स्थानिक तसेच पत्रकार यांना आला असेल
कारण
जेव्हा पोलिस पथकाने छापा टाकला आणि वाळू भरलेला ट्रॅक्टर
जेव्हा हिवरगाव हद्दी मध्ये ओढ्यात पकडला. तेव्हा PSI खांडबहाले साहेब यांनी ट्रॅक्टर पोलिस स्टेशन येथे घेण्यास सांगितला.परतू वाळू तस्कर संदीप रमेश वाकचौरे याने त्याचा भाऊ शेखर रमेश वाकचौरे
याला बोलून घेतले तेव्हा शेखर रमेश वाकचौरे हा बुलेट बाईक घेऊन पथका पाशी हजर झाला आणि त्याने पोलिस पथका समोरच ट्रॅक्टर हायड्रोलिक चालू करून वाळू खाली करून देण्याचा प्रयत्न केला. ट्रॉली मधील बऱ्याच प्रमाणातील वाळू ही कारवाई जिथे झाली त्या ठिकाणी अजूनही पडलेली आहे..
- ✍️✍️✍️✍️✍️✍️
-
. प्राथमिक माहिती नुसार शेखर रमेश वाकचौरे पोलिस पथकाला म्हणाला की तुमचा येथे येण्याचा काय संबंध. तुम्ही ड्रेस वर नाही. कार्यवाही करू शकत नाही असे बोलून ट्रॅक्टर ड्रायवर सीट वर बसेल असणाऱ्या पोलिस ला लोटून ट्रॅक्टर पळून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. बराच वेळ पोलिस सोबत हुज्जत घालण्यात आली
-
मग इथे प्रश्न एक निर्माण होतो. जर खरोखर असे झाले असेल तर याची माहिती त्या पथकाने आपल्या वरिष्ठांना दिली का. मग दिली असेल तर सरकारी कामात अडथळा तसेच पोलिस पथकाच्या ताब्यात असणाऱ्या ट्रॅक्टर चा ताबा घेऊन वाळू खाली करून देण्याचे धाडस कसे केले गेले. आणि त्याचा पुरावा रस्त्यात वाळू सांडलेली आहे.
याचा पंचनामा तसेच शेखर रमेश वाकचौरे वर कार्यवाही का होऊ शकली नाही..हा मोठा प्रश्न येते उभा राहतो.🌎🌎🌎
ट्रॅक्टर आणि जेसीबी अकोले येते जप्त करून नेत असताना आमदार डॉ लहामटे यांचे अनेक कार्यकर्ते यांनी मध्यस्ती करून सोडून देण्याचा प्रयत्न झाला परतू प्रयत्न यशस्वी झाला नाही..
जे डॉक्टर लहामठे बोलतात मी दोन नंबर वाल्यांचा कर्दनकाळ आहे.. मग तुमचे कार्यकर्ते कोणता काळ आहे याचा एकदा तापस करावा. कारण 2 नंबर चे काम करताना प्रशासनाने पकडले तर लगेच कार्यकर्ते जमा होतात आणि त्या अधिकाऱ्यावर कार्यवाही न करावी यासाठी दबाव आणतात..
हे किती दिवस चालत राहील. बीड मध्ये राखे पासून गुंड तयार होतात. तर इकडे वाळू पासून गुंड तयार झाले आहे. ना पोलिस प्रशासन ची भीती ना महसूल खात्या ची भीती..
हे असेच सुरू राहिले तर बीड सारखे अकोले ला होण्यास उशीर लागणार नाही…
✍️✍️✍️
तेव्हा तहसीलदार यांनी पकडलेल्या ट्रॅक्टर वर तसेच अन्य वाहनावर कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी. कारण जिथे वाळू उपसा होत होता तिथे येऊन एकदा तहसीलदार साहेब नी येऊन बघावे किती प्रमाणात अवैद्य उत्खनन केले असुन किती प्रमाणात वाळू तस्करांनी वाहून नेली असून. जागेवर येऊन स्पॉट पंचनामा करण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्र शासन ची ही फसवणूक असून वाळू तस्कर संदीप रमेश वाकचौरे कडून कोटी मधे दंड आकारण्यात यावा..
यासाठी स्टार वन न्युज 7 मीडिया लवकरच मुख्यमंत्री तसेच महसूल मंत्री चंद्शेखर बावनकुळे-पाटील याची भेट घेऊन संबंधीत वाळू डेपो करून ठेवलेला व्हिडिओ फुटेज तसेच वाळू जेथून काढली जाते तेथे केलेले उत्खनन फोटो व्हिडिओ देऊन तक्रार करणार आहोतच
तसेच काल तहसील कार्यालय ने केलेल्या कार्यवाही वर ही शंका असल्याने त्याची ही तक्रार लवकरच करणार आहोत कारण आम्हाला अकोलेचा बीड होऊ द्यायचा नाही..✍️✍️
🔴तहसील कार्यालयाने केलेल्या कार्यवाही वर शंका ❗
✒️काल शंका येण्या सारखीच घडामोड घडत होती कारण ✍️
गुप्त माहिती द्वारे अकोले पीआय यांना मिळाली त्यानंतर छापा टाकला ट्रॅक्टर jcb जप्त केले. अकोले तहसील पुढे आणून लावले.
मग तहसीलदार यांनी एक पथक 2वाजून 30 मि नेमल आणि वाळू तस्कर संदीप रमेश वाकचौरे याचा घरी जाऊन किती वाळू साठा आहे याचा पंचनामा करण्यास सांगितला .✍️
👉परतू ही माहिती तस्कर संदीप रमेश वाकचौरे च्या घरी समजली की पथक येत आहे
मग तस्कर चा भाऊ शेखर वाकचौरे ने दुसरा ट्रॅक्टर जोडून केनी च्या साहाय्याने तो डेपो सपाट करण्यासाठी काम सुरू केले. तसेच अन्य घरातील महिला आणि पुरुष मिळून डेपो सपाट करण्या साठी धावपळ करत होते.
तो डेपो प्रथमदर्शनी ची माहिती नुसार 80 ते 90 ब्रास वाळू होती.
कारण काल सकाळ पासून पथक कार्यवाही करे पर्यंत च 10 ते 15 ट्रॅक्टर नेऊन ओतण्यात आले होते.✍️
जो डेपो करून ठेवला होता. त्या डेपो चा व्हिडिओ स्टार वन न्युज मराठी च्या हाथी लागला आहे.
3 नंतर अकोलेतून जे पथक कार्यवाही करण्यासाठी येत होते तेव्हा डेपो सपाट करण्याचे काम ट्रॅक्टर तसेच महिला करत होत्या त्याचे फुटेज स्टार वन न्युज मराठी कडे आहे. आणि ते सगळे पुरावे लवकरच महसूल मंत्री तसेच मुख्यमंत्री यांकडे दिले जातील ✍️✍️
तहसील कार्यालयतून जे पथक कार्यवाही साठी रवाना झाले ते पथक 3 नंतर निघालेल ले त्या पथकाला सूत्राकडून वारंवार सांगण्यात येत होत की साठून ठेवलेली वाळू ही सपाट करण्याचे काम सुरू आहे तुम्ही लवकर जा. परतू पथक जणू साठावाळू गायब करण्याची वाट बघत असावे. त्यामुळे त्यांना ही स्पॉट वर येण्यासाठी उशीर झाला असावा.✍️✍️
पथक आल्यावर लगेच पंचनामा झाला परतू पथकातील झालेली कार्यवाही पथकातील अधिकारी यासोबत सूत्रांकडून दिली गेलेली माहिती आणि त्यांना कार्यवाही साठी माहिती कोण देतय
तहसीलदार साहेब यांचा दुपारी 2 वाजल्या नंतर तहसीलदार साहेब कोणाला कॉल करून माहिती घेत आहे त्यांना झालेला कॉल त्या कॉल नंतर साहेब यांनी नेमलेले पथक ही सगळी माहिती वाळू तस्कर संदीप रमेश वाकचौरे आणि जेसीबी मालक गौतम घोसळे यांना मिळत होती..
ही माहिती पथकातील कोण देत होते की खिशात असणारे सर्कल देत होते हा पेच निर्माण झाला आहे..
याचा ✍️✍️✍️ अर्थ कुंपणच शेण खातय
मग ही गुप्त माहिती पथकातील कोण अधिकारी देत होता. मग पथकातील लच अधिकारी या कार्यवाही करण्याचा मनस्थित नसेल आणि फक्त तहसीलदार साहेब यांचा आदेश आला मग ना इलाज म्हणून कार्यवाही करण्यासाठी आले असतील तर जो वाळू पंचनामा झाला तो काय केला असेल असा ही प्रश्न मिडिया पुढे पडला होता.
कारण काल सायंकाळी पर्यंत मिडिया अकोले तहसील कार्यालय मध्ये येऊन जात तसेच ज्यांनी स्पॉट पंचनामा केला त्या पथकाला MH मराठी ,आज दिनांक , स्टार वन न्युज मराठी अन्य मिडिया यांनी सम्पर्क केला असता. अधिकारी यांचे
मोबाईल बंद लागले तर काही ना पत्रकार यांनी वारंवार संपर्क केला असता त्यांनी कॉल उचलले नाही आणि त्यांनी परत कॉल करून रिप्लाय देण्याची तसदी ही घेतली नाही.
त्या मुळे तहसील कार्यालय पथकाने पंचनामा करून किती ब्रास वाळू चा पंचनामा केला मिडिया ला कळू शकले नाही
पंचनामा केल्यानंतर जी रिकावरी केली जाते त्याबद्दल प्रथम मिडिया ला माहिती देणे गरजेचे होते परतू कालचा पंचनामा बघता
तहसील कार्यालय ने पाठवलेल्या पथकावर शंका निर्माण होत आहे.परतू याबाबत लवकरच महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री यांकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे..
UPDATED BY स्टार वन न्युज मराठी ™
अकोले