STAR ONE NEWS MARATHI-  संपादक - सचिन रेवगडे +919623968773 MH-01-0181832/Page Visiter 20 Lakh 14 k
महाराष्ट्रसंगमनेर

संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध अध्यक्षपदी मा. बाळासाहेब थोरात साहेब तर पांडुरंग घुले यांची उपाध्यक्षपदी निवड.प्रतिनिधी आशिष उंबरडे +919765777938

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वर्चस्वाखालील संगमनेर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याचची निवडणूक बिनविरोध

Published by- स्टार वन न्युज मराठी

आशिष उंबरडे स्टार वन न्यूज मराठी प्रतिनिधी ✍️ नारायणगाव
आशिष उंबरडे
स्टार वन न्यूज मराठी प्रतिनिधी ✍️

13 मे 2025संगमनेर :

राज्याला दिशादर्शक असणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर तसेच राज्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या संगमनेरच्या भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक फुसका बार ठरल्यात जमा होतीच .कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी बुधवारी ही बाब स्पष्ट झाली होती. 

   ‘सहकारी चळवळीत राजकारण नको’ अशी आमची भूमिका असल्याने यावेळची संचालक मंडळाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे विरोधकांनी जाहीर केले होते.सत्ताधारी पक्षातल्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी सबुरीचा सल्ला दिल्याने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वर्चस्वाखालील संगमनेर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याचची निवडणूक बिनविरोध झाली त्या अनु संघाने निवडीची प्रक्रिया होऊन
 मा. बाळासाहेब थोरात साहेब
यांची सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी तर श्री. पांडुरंग घुले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. सभासद शेतकरी संचालक मंडळानी नव निर्वाचिता ना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

Updated by स्टार वन न्युज मराठी
आशिष उंबरडे– संगमनेर प्रतिनिधी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Page Visiter 20 Lakh 14 k