STAR ONE NEWS MARATHI-  संपादक - सचिन रेवगडे +919623968773 MH-01-0181832/Page Visiter 20 Lakh 14 k
महाराष्ट्र

हाज यात्रेसाठी तांबोळी यांना शुभेच्छा व पत्रकार संघाच्या वतीने सत्कार.

हाज यात्रेसाठी तांबोळी यांना शुभेच्छा व पत्रकार संघाच्या वतीने सत्कार.

हाज यात्रेसाठी तांबोळी यांना शुभेच्छा व पत्रकार संघाच्या वतीने सत्कार.
निघोज – प्रतिनिधी.
निघोज येथील तांबोळी कुंटुंबाचे कारभारी ईन्नुसभाई तांबोळी व त्यांच्या पत्नी व बहीण या शुक्रवार दि.२३ रोजी पहाटे पाच वाजता मुंबई विमानतळावरुण हाज यात्रेसाठी रवाना होणार असून बुधवार दि.२२ रोजी तांबोळी यांचा पत्रकार संघ विभागीय कार्यालय निघोज या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीने पारनेर तालुका पत्रकार संघाचे सदस्य योगेश खाडे, कपिलेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे, गणेश श्रीमंदीलकर आदी उपस्थित होते. वरखडे यावेळी शुभेच्छा देताना म्हणाले की तांबोळी यांनी धार्मिक सेवाभाव करताना सर्व धर्मीयांशी समन्वय ठेऊन यात्रा,दसरा,उरुस यामध्ये सहभागी होऊन हिंदू – मुस्लिम एकतेसाठी तांबोळी कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात योगदान असून हाज यात्रेसाठी जाणाऱ्या तांबोळी कुटुंबाला वरखडे यांनी पत्रकार संघ,कपिलेश्वर उद्योग समूह तसेच निघोज ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ तसेच मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार योगेश खाडे यांनी केले शेवटी निलेश जंगम यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Page Visiter 20 Lakh 14 k